मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन हा 1.54 लाख कोटी गुंतवणूक असलेला उद्योग अचानक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून, राजकीय नेत्यांमध्ये वाद व्हायला लागले आहेत. विरोधी पक्षनेते प्रकल्प गुजरातला गेलेल्यामुळे सत्ताधारी नत्यांवर आरोप करत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकल्पा संदर्भात एक दावा केला होता. त्यांच्या वक्तव्यावर भाजप पक्षाचे आमदार अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अमित साटम ?
महाराष्ट्रात प्रकल्प व्हावा यासाठी आघाडीने खूप प्रयत्न केल्याचा जयंत पाटीलांचा दावा सपशेल खोटा असल्याचं म्हणत अमित साटम यांनी महाविकास आघाडी आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून जाणूनबुजून काढून घेतल्याचा दावा फेटाळून लावला आहे.अमित साटम प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते असंही म्हणाले की, फॉक्सकॉन कंपनी गुजरातला जाणे हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला असल्याचं म्हणत, अमित साटम यांनी विरोधी पक्षनेत्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीनेच राज्य दिवाळखोर आणि वेळेवर वाटाघाटी करण्यास सक्षम नाही हे दर्शविले आणि आमच्याकडील तरुणांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्याचा आरोप साटम यांनी केला आहे.
तसेच, अमित साटम यांनी महाविकास आघाडीवर एक आरोप देखील केला असल्याचं समजतं आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे नेते आता दावा करत आहेत की त्यांनी कंपनीचा पाठपुरावा केला. पण प्रत्यक्षात त्यांचा पाठपुरावा कंपनीला परवडणारा नव्हता.
महत्वाच्या बातम्या :
- Yashomati Thakur | महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा कट – यशोमती ठाकूर
- Ravi Rana | खासदार नवनीत राणांविरोधात अमरावतीत आंदोलन! रवी राणा संतापले
- Satyajeet Tambe | वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा – सत्यजित तांबे
- Supriya Sule | महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रोजेक्ट मिळत असेल तर खूप दुर्दैवी – सुप्रिया सुळे
- Foxconn-Vedanta : “मुख्यमंत्री ४० आमदारांसह दोन प्रोजेक्टही तिकडे घेऊन गेले”


