मुंबई : 1 लाख 58 हजार कोटींची एकूण गुंतवणूक असणारा वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे याचे महाराष्ट्राच्या राजकारणात पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. अशातच राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सगळ्या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
जयंत पाटील यांचा सवाल –
जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची एक व्हिडीओ क्लिप आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट केली आहे. त्यामध्ये अनेक उद्योगपती येतायत. तो वेदांता वाला आला होता, जवळपास ४ लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत. असे लोक येतायत आपल्याकडे, असं एकनाथ शिंदे बोलत असल्याचं दिसून येतं आहे.
“अनेक उद्योगपती येतायत. तो वेदांता वाला आला होता, जवळपास ४ लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत. असे लोक येतायत आपल्याकडे…” pic.twitter.com/EdrRlJCXPK
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 14, 2022
आणखिन एक ट्विट करत जयंत पाटील म्हणाले की, 25 ऑगस्ट 2022 रोजी मा. मुख्यमंत्री यांचे हे सभागृहातील विधान आहे. त्यानंतर फक्त २० दिवसात एवढा मोठा बदल कसा घडला, यात कोणाचा हस्तक्षेप होता, कोणाचा दबाव होता याचे उत्तर संपूर्ण राज्यातील जनतेला व विशेषतः युवा वर्गाला अपेक्षित आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी सत्ताधऱ्यांवर हल्ला करत महाराष्ट्राच्या मंत्र्यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याच आरोपही केला आहे.
२५ ऑगस्ट २०२२ रोजी मा. मुख्यमंत्री यांचे हे सभागृहातील विधान आहे. त्यानंतर फक्त २० दिवसात एवढा मोठा बदल कसा घडला, यात कोणाचा हस्तक्षेप होता, कोणाचा दबाव होता याचे उत्तर संपूर्ण राज्यातील जनतेला व विशेषतः युवा वर्गाला अपेक्षित आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 14, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Amit Satam | “वेदांता-फॉक्सकॉन संदर्भात जयंत पाटीलांनी केलेला दावा सपशेल खोटा”
- BCCI। सौरव गांगुली पुन्हा होणार बीसीसीआयचे अध्यक्ष?; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय
- Yashomati Thakur | महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा कट – यशोमती ठाकूर
- Ravi Rana | खासदार नवनीत राणांविरोधात अमरावतीत आंदोलन! रवी राणा संतापले
- Satyajeet Tambe | वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा – सत्यजित तांबे


