Aurangabad। मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत ५० आमदार सोबत घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. यामध्ये शिवसेनेचे ४० आमदार होते. यानंतर शिवसेनेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक महापालिकेतील नगरसेवक आणि त्यानंतर तब्बल १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल आहे. सध्या शिवसेनेची सुरु असलेली गळती थांबण्याचं दिसत नाहीये. त्यातच आता औरंगाबाद मधून मोठी बातमी समोर येत आहे.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर आता राज्याच्या प्रमख शहारांतील महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद महापालिकेचा देखील समावेश आहे. सध्या औरंगाबाद महापालिकेमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. औरंगाबादमधील शिवेसनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याची तयारी आता भाजपाने सुरू केली आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपा शिंदे गटासोबत युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपाच्या बाबतीत पहिली प्राथमिक बैठक सुद्धा पार पडली आहे. शिंदे गट आणि भाजपा औरंगाबाद महापालिका निवडणूक एकत्र लढवणार असल्याच्या वृत्ताला भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांकडून देखील दुजोरा देण्यात येत आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच निवडणूक लढवण्याबाबतची रणनीती आणि जागावाटपाचे सूत्र ठरण्याची शक्यता आहे. पुढील काळात आणखी काही बैठका होणार असून ,त्यांनतर अंतिम निर्णय होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | महाराष्ट्रात लवकरच ‘महाभारत’ होणार – अमोल मिटकरी
- Mahesh Tapase | सरकार स्थापन करुन महिना झाला तरी मंत्रीमंडळ नाही हे दुर्दैव – महेश तपासे
- Sanjay Raut | “प्रामाणिकपणासाठी मी त्याचं कौतुक करतो”; संजय राऊतांनी उधळली खोतकरांवर स्तुतीसुमने
- Ajit Pawar : “मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी”; अजित पवारांचा सल्ला
- Maharashtra Cabinet Expansion | एक महिन्याचे सरकार! मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा, मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

