मुंबई : सध्या शिवसेनेचा खडतर काळ सुरु आहे. रोज शिवसेनेला नवनवीन धक्के बसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि जवळपास 40 हुन जास्त आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यानंतरही अनेक आमदारांनी शिवसेनेच्या पदांचे राजीनामे दिले आणि शिंदे गटात सामील झाले. त्यातच नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे खोतकर हे शिंदे गटात सामील झाले असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांनी स्वतः “मी शिवसेनेशी एकनिष्ठ” असल्याचं सांगितले. असे असले तरीही खोतकर अजूनही शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. मात्र तरी देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोतकरांचे कौतुक केले आहे.
खोतकरांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘”मी स्वतः खोतकरांचं निवेदन ऐकलं आहे. ते आमचे जुने सहकारी आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणासाठी मी त्याचं कौतुक करतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर कोणत्या यंत्रणेचा दबाव आहे आणि तो का आहे. आणि कोणताही माणूस अशा संकटाच्या काळात सुटकेचा मार्ग शोधत असतोच. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. त्यांनी विनाकारण हिंदुत्वाला बदनाम केलं नाही. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आक्षेप किंवा शिवसेनाप्रमुखांवर आक्षेप असल्यामुळे मी शिवसेना सोडतोय. असं काहीही न बोलता त्यांनी जे काही खरं आहे तेच सांगितलं.”
दरम्यान अर्जुन खोतकर यांनी त्यांची अंतिम भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. ते शिवसेनेतच राहणार कि शिंदे गटात जाणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. याबद्दल खोतकरांना विचारले असता. “इथे दिल्लीत मी वेगळ्या कामासाठी आलो आहे. मी जालन्याला गेल्यावर माझी भूमिका जाहीर करेन”,असे खोतकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Ajit Pawar : एवढं मोठं बहुमत मिळालं आहे, मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाही?, अजित पवारांचा सवाल
- Shivsena : ‘प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार …’ सेनेचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप
- Samana : उद्धव ठाकरे यांनी एक मुलाखत काय दिली, अन् राज्यात जणू भूकंपाचे हादरेच बसले
- Sandipan Bhumre : ‘हो एकनाथ शिंदेंना पक्षप्रमुख व्हायचेय’,पण…; संदिपान भूमरे स्पष्टचं बोलले
- Vinayak Raut : “शिंदे-फडणवीस यांच्या शुभेच्छांना आम्ही किंमत देत नाही”; विनायक राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

