पुणे : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचा या निकालाने मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. या मुद्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण देखील चांगलेच तापलेले आहे.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा संघर्ष करण्याची भूमिका मराठा नेत्यांनी केली घेतली आहे. आता भाजपने मराठा समाजासोबतच आरक्षणासाठी संघर्ष करण्याची आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे.
मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल. महाविकासआघाडी सरकार मराठा समाजाचा प्रक्षोभ दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजप हा डाव हाणून पाडेल, अशी घोषणाच जगदीश मुळीक यांनी केली आहे.
राज्यातील मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही ! – मेटे
राज्यातील मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा आवाज आणि आंदोलन दाबण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याचे षड्यंत्र रचले आहे. मात्र 31 तारखेनंतर लॉकडाऊन असले तरी 5 जूनला बीडमध्ये भव्य मराठा आरक्षण मोर्चा काढणार आहोत तो कुठल्याही कारणास्तव रद्द केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याने भाजपचे तीन आमदार ताब्यात
- ‘घरात नाही दाणा पण मला “वॅक्सिन गुरू” म्हणा…’; चाकणकरांची केंद्रावर टीका
- सकारात्मक! उस्मानाबादेत कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ
- ‘अजितदादा मंत्रालयात आले, आता मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार ?’
- पुण्यात गँगवारमध्ये मृत्यू झालेल्या गुंडाच्या अंतयात्रेला १२५ दुचाकी; ८० जणांना अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

