मुंबई : डोंबिवलीच्या टिळकनगर भागात खाजगी क्लासेस घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्याला अटक केली आहे. पप्पू सहानी असे या आरोपीचे नाव आहे.
आरोपी पप्पू सहानी हा कल्याण पूर्व भागातील कचोरे येथील गोविंदवाडी भागात राहतो. तो मुलुंड येथील भाजपा कार्यालयात गटप्रमुख आहे. या घटनेनंतर भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी प्रतिक्रिया दिली असून पप्पू सहानी याचा भाजपाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
पीडित मुलगी ही टिळकनगर भागातील लहान मुलांचे खासगी शिकवणीचे क्लासेस घेते. आरोपीची मुलगीही याच मुलीकडे शिकवणीसाठी होती. रविवारी रात्री १० वाजेदरम्यान पीडिता ही आरोपीच्या मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेली होती. पीडिता आरोपीच्या मुलीला सोडून घरी परतत असताना आरोपीने रस्त्यात गाठून अंधाराचा फायदा घेत तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडितेने बळाचा वापर करत सुटका करुन घेतली. असे पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती टिळकनगर पोलिसांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- आरएसएसबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून जावेद अख्तरांना न्यायालयाचा दणका
- रावसाहेब दानवे ठेकेदाराला त्रास देत असल्याचे खुद्द मला नितीन गडकरी यांनीच सांगितले, खैरेंचा गौप्यस्फोट!
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- पहिला प्रयत्न वाया, आता अकरा कोळसा खाणींच्या लिलावासाठी आता दुसऱ्या प्रयत्नाची प्रक्रिया सुरु
- करुणा शर्मा प्रकरणावरून पंकजांची धनंजय मुंडेंवर पुन्हा टीका; ‘एट्रॉसिटी हा दलितांसाठी कवच कुंडल, पण..’

