Share

#व्यक्तिविशेष : २०११ विश्वचषकाचा शिलेदार सुरेश रैना उर्फ ‘चिन्ना थाला’चा आज जन्मदिवस!

Published On: 

पुणे : सुरेश रैना उर्फ मि.आयपीएल, मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज आणि अत्यंत चपळ क्षेत्ररक्षक….! २००५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या या खेळाडूला लोकांच्या नजरेत यायला तसे बरेच दिवस लागले. २०११ च्या विश्वचषकात युसूफ पठाणच्या जागी संधी मिळाली आणि त्याने याने सोने केले. समोर सलग ३ विश्वचषक जिंकलेला ऑस्ट्रेलिया सारखा अतिबलढ्य संघ आणि त्यातच सेहवाग, सचिन, गंभीर आणि धोनी हे भारताचे प्रमुख खेळाडू बाद होऊन तंबूत परतले होते. मैदानावर फक्त युवराज सिंग आणि रैना…!

समस्त भारतीय क्रिकेट फॅन्सच्या काळजात धडकी भरलेली होती कारण याच ऑस्ट्रेलियाकडून २००३ मध्ये अंतिम सामन्यात पराभव पत्करून आपण परतलो होतो, पण तो दिवस काही वेगळाच होता. या नवख्या फलंदाजाने तगड्या युवराजच्या खांद्याला खांदा लावून तुफान बॅटिंग करत तो सामना भारताच्या खिशात घातला आणि ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानच्या विरोधातही अशीच नाबाद कामगिरी बजावून तो लोकांच्या नजरेत आला. अगदी प्रशिक्षक गॅरी क्रिस्टन यांनीही,’रैनाने आमच्यासाठी विश्वचषक जिंकला’ या शब्दात त्याचे कौतुक केले होते.

यानंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थोडे चढ आणि थोड्या उतारांचा सामना करत त्याने भारतीय संघाकडून मधल्या फळीतील आपली वाटचाल सुरू ठेवली. परंतु इंडियन प्रीमिअर लीग मध्ये मात्र सलग धडाकेबाज कामगिरी करत त्याने हळूहळू ‘मि. आयपीएल’ हे नाव कमावण्यास सुरवात केलेली होती. सुरवातीपासूनच चेन्नई सुपरकिंग्स या संघाकडून खेळताना त्याने कित्येक सामन्यात संघाला विजयश्री संपादन करून दिली.

मध्यंतरी चेन्नईचा संघ स्पर्धेबाहेर असताना २०१६ -२०१७ साली त्याने गुजरात लायन्स संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. बॅटिंग, कप्तानपदा बरोबरच त्याने फिरकी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चपळाईने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला, T-20 आणि एकदिवसीय विश्वचषकात शतक करणारा एकमेव भारतीय खेळाडू असे कित्येक विक्रम याने स्वतःच्या नावावर केले.

आधुनिक युगातील मैत्रीच्या जोडयांपैकी धोनी-रैनाची जोडी, १५ ऑगस्ट २०२० रोजी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर रैनानेही क्रिकेतजगतातून निवृत्ती घेतली. यंदाच्या आयपीएल सत्रात त्याला वैयक्तिक कारणांमुळे माघार घ्यावी लागली होती. रैनाच्या गैरहजेरीची उणीव चेन्नईच्या संघाला भासली. मधल्या फळीत निर्मण झालेल्या पोकळीमुळे हार पत्करत चेन्नईला यंदाच्या सत्रात तळातून दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

आयपीएलसह भारतीय संघासाठी सुरेश रैनाने केलेली कामगिरी ही क्रिकेट रसिकांसाठी रंजक कहाण्यांपैकी एक ठरली असून अशा या लाडक्या चिना थालाचा आज वाढदिवस! त्याला या जन्मदिनी अनेक शुभेच्छा!!!

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!