Share

डब्ल्युटीसी फायनलपूर्वी न्युझीलंडच्या खेळांडूकडून बायो बबलचे उल्लंघन?

Published On: 

मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅम्पटन येथे दाखल झालेले आहे. मात्र सामन्याच्या एक दिवस आधी न्युझीलंडच्या गोटातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

डब्ल्युटीसी अंतिम सामन्याला काही तास शिल्लक असताना न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंनी बायो बबल प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे वृत्त समोर आले आहे. न्युझीलंडच्या संघातील काही खेळाडू हे बायो बबलच्या बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी गोल्फ खेळण्यासाठी ते बाहेर गेले होते अशी माहिती मिळाली आहे. ही माहिती मिळताच भारतीय संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयला याबाबत माहिती दिली. या प्रकाराबद्दल बीसीसीआय आयसीसीकडे तक्रार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बायो बबलमधुन बाहेर पडणाऱ्या खेळाडुंत ट्रेंन्ट बोल्ट, टीम साउदी, हेन्री निकोलस, मिशेल सेंटनर, डेरिल मिशेल यांचा समावेश होता. तसेच न्युझीलंड संघाचे फिजीओ सिमसेकही खेळाडुसोबत गोल्फ खेळायला गेले होते. मात्र न्युझीलंडच्या संघाने या आरोपाला नाकारले आणि म्हणाले की खेळाडु राहत असलेले हॉटेल आणि गोल्फ कोर्स हे एकाच परिसरात आहे. त्यामुळे आम्ही बायोबबलच्या नियमाचे उल्लंघन केलेले नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!