Share

मदतीसाठी सरकारच्या तिजोरीत खडखडाट मात्र मंत्र्यांच्या बंगल्यांवर उधळपट्टीचा सुळसुळाट

Published On: 

मुंबई : एकीकडे अव्वाच्या-सव्वा वीजबिलात सूट देताना सरकारवरच्या कर्जाचा पाढा वाचला जातोय तर दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांवर पैसे ओतले जातायत. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण याआधीही अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवेळी पुढं करण्यात आलं होतं.

सरकार कोणतंही असो मात्र जनतेच्या कराचा पैसा थेट लोकोपयोगी कामं प्राधान्याने न करता मंत्र्यांच्या गाड्यांवर इतर सोयीसुविधांवर खर्च होत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्या होत्या. यावरून अनेकदा वादही झाले. सध्या ठाकरे सरकारच्या कारभारात सार्वजनिक बांधकाम विभागानं काही मंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांच्या एकूण 31 बंगल्यांच्या डागडुजीसाठी निविदा काढल्या आहेत.

निविदा सादर होण्याआधीच बंगल्यांच्या कामाला सुरुवात झाली असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. त्यामुळे या प्रकार काय आहे याचा उलगडा शासन वा संबंधित विभागाचे मंत्री देणार? की यातही क्लीनचिट मिळून हा वाद सामान्य जनता विसरल्यानंतर मिटणार? असा सवाल निर्माण होत आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार एकूण 31 बंगल्यावर जवळपास 15 कोटींची उधळपट्टी सुरु आहे. यातील सर्वात जास्त खर्च हा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री छगन भुजबळांच्या बंगल्यावर होत आहे, असा दावा देखील करण्यात आला आहे. रॉयल स्टोनसाठी 1 कोटी 81 लाख तर रामटेकसाठी 1 कोटी 48 लाखांचा खर्च होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!