🕒 1 min read
मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या व्यक्तींकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेनं, १ ऑक्टोबर २०२० ते २१ ऑक्टोबर २०२० या कालावधीत, १ कोटी ६४ लाख ९६ हजार ९०० रुपयांचा दंड वसुल केला, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. याअंतर्गत एकूण ८२ हजार ४९७ व्यक्तींवर मास्कचा वापर न केल्याबद्दल कारवाई केली अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली.
याशिवाय ९ एप्रिल ते २१ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान, मास्कचा वापर न करणाऱ्या एकूण १ लाख ७५२ व्यक्तींकडून, पालिकने २ कोटी ३० लाख २९ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल केल्याचंही पालिकेनं कळवलं आहे. कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून मास्क लावणं बंधनकारक आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पालिकेनं २०० रुपयांच्या दंडात्मक कारवाईची तरतुद केली आहे.
दरम्यान,नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (२३ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १४२४३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ५४,८०,५००/- चा दंड वसूल केला आहे.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४८, धरमपेठ झोन अंतर्गत ५०, हनुमाननगर झोन अंतर्गत १९, धंतोली झोन अंतर्गत ११, नेहरुनगर झोन अंतर्गत १७, गांधीबाग झोन अंतर्गत १८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ७, लकडगंज झोन अंतर्गत ९, आशीनगर झोन अंतर्गत १९, मंगळवारी झोन अंतर्गत १७ आणि मनपा मुख्यालयात ५ जणांविरुध्द शुक्रवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ८७७३ बेजबाबदार नागरिकांकडून रु ४३ लक्ष ८६ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का ? – खडसे
- देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी
- कांद्याच्या दरात वाढ : बफर साठ्यातून कांदा आणण्याला सरकारकडून गती
- खडसे साहेब शेतकरी कमकुवत झाला आहे, तिथं तुमची ताकद दाखवा – प्रवीण दरेकर
- पक्षात येवून कष्ट करण्याची भूमिका नाथाभाऊंनी व्यक्त केलीय – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
