Share

देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- कोरोनावर उपाय म्हणून विकसित होत असलेल्या देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या सहकार्यानं ही लस विकसित केली आहे. लस परिक्षणाचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा येत्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल.

१८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २८ हजाराहून अधिक लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात येणार असून, दहा राज्यातल्या १८ ठिकाणी हे परिक्षण होईल. मुंबईचाही त्यात समावेश आहे.कोवॅक्सिन असं या लसीचं नाव असून या व्यतिरिक्त जायड्स कॅडिला लिमिटेडद्वारा तयार होत असलेल्या अन्य एका स्वदेशी लसीचं परिक्षण दुसऱ्या टप्प्यात आहे.

दरम्यान, भारताने कोविड चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. आतापर्यंत एकूण 10 कोटी (10,01,13,085) चाचण्या करण्यात आल्या आहेत.गेल्या चोवीस तासात 14,42,722 चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील चाचण्यांच्या क्षमतेत कित्येक पटीने वाढ झाली असून देशात राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या सहकार्याने सध्या जवळपास 2000 प्रयोगशाळा सुरू आहेत. याद्वारे दररोज सुमारे 15 लाख नमुन्यांची चाचणी केली जाऊ शकते.

देशातील चाचण्यांच्या संख्येत वाढ होण्यात चाचण्यांच्या पायाभूत सुविधांमधील सुधारणा महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.देशातील 1989 चाचणी प्रयोगशाळांमध्ये 1122 सरकारी प्रयोगशाळा आणि 867 ;खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. दैनंदिन चाचणी क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पॉझिटीव्हीटी दरही कमी होत आहे. याचाच अर्थ रोगाचा प्रसार होण्याचे प्रमाण कमी होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!