पटना- बिहारमध्ये येत्या 28 तारखेला 16 जिल्ह्यात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रचारकांनी एका दिवसात अनेक प्रचारसभा घेण्याचा धडाका लावला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांना काल सासाराम इथल्या जाहीर सभेनं सुरुवात झाली.
बिहारमधल्या विकासकामांना गती देण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मत देण्याचं आवाहन आज मोदी यांनी यावेळी केलं. राज्याला कमजोर बनवणाऱ्या पक्षांना मत न देण्याचा निर्धार बिहारमधल्या नागरिकांनी केला आहे, असं मोदी म्हणाले.
गया आणि भागलपूर इथंही आज पंतप्रधानांच्या प्रचारसभा झाल्या. राष्ट्रीय जनता दलाच्या 15 वर्षांच्या सत्ताकाळात बिहारमध्ये गुन्हेगारी वाढली हो, अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात राज्यात विकास होत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिसुआ आणि कहलगाव इथल्या सभांनी प्रचाराला सुरुवात केली. राज्यातल्या आणि केंद्रातल्या सत्ताधारी पक्षांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. बसपा अध्यक्ष मायावती आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी करगहार इथं संयुक्त प्रचारसभा घेतली.
महत्वाच्या बातम्या-
- रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आणखी वाढ ! अजून एक तक्रार दाखल
- महिला अपक्ष आमदार करणार शिवसेनेत प्रवेश,भाजपला आणखी एक धक्का
- ‘सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदारच राष्ट्रवादीने फोडला’
- शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीच्या खासदाराविरोधात विरोधात हक्कभंग प्रस्ताव
- ऊर्जा विभागात नोकरीची संधी : ‘महापारेषण’मध्ये होणार 8500 पदांसाठी भरती


