Share

‘सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदारच राष्ट्रवादीने फोडला’

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर- भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला.

माझ्यावर अन्याय झाला, माझी बदनामी करण्यात आली, भाजपामध्ये संधी मिळेल याची अपेक्षा नव्हती, म्हणून निरपेक्ष भावनेनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं. भाजपाचं काम ज्या निष्ठेनं केलं त्याच निष्ठेनं आणि दुप्पट वेगानं राष्ट्रवादी काँग्रेसचं करेन, असंही ते म्हणाले.

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकनाथ खडसे यांचा अनुभव मोलाचा ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांच्याबरोबर त्यांच्या कन्येसह अन्य दहा जणांनीही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. मात्र या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.

70 हजार कोटींची सिंचन घोटाळ्याची ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. एकनाथ खडसे हे यातील प्रमुख साक्षीदार आहेत, त्यामुळे प्रमुख साक्षीदार राष्ट्रवादीने फोडल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.  आता खडसे या आरोपांना कश्या पद्धतीने उत्तर देणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!