🕒 1 min read
रायगड- भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या इराद्याने एकत्र येवून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मात्र भिन्न विचारसरणी असणारे हे पक्ष एकत्र आल्याने अधूनमधून धुसफूस सूरच असते. कधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी तर कधी शिवसेना -राष्ट्रवादी असा संघर्ष सुरूच असतो.
कोकणात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. आमदार योगेश कदम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला आहे.
आमदार योगेश कदम यांच्या दापोली विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे मला डावलून विविध शासकीय कार्यक्रम घेत असल्याचा आरोप योगेश कदम यांनी केलाय. 12 ऑक्टोबरला झालेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण न देता सुनील तटकरेंनी दापोली येथील पंचायत समिती सभागृहात शासकीय अधिकाऱ्यां सबत आढावा बैठक घेतली. रायगड-रत्नागिरी जिल्हे जोडणारा आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरून जड वाहने नेण्यास मनाई करण्यात आल्याने या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी आपण प्रयत्न केले, तर राज्यमंत्री अदिती तटकरे यांनीही संबंधित अधिका ऱ्यांच्या या पुलासंदर्भात बैठका घेतल्या होत्या.
दरम्यान, विशेष म्हणजे खासदाराविरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकार एकत्रित असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आणखी वाढ ! अजून एक तक्रार दाखल
- महिला अपक्ष आमदार करणार शिवसेनेत प्रवेश,भाजपला आणखी एक धक्का
- ‘सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदारच राष्ट्रवादीने फोडला’
- ‘राष्ट्रवादी सर्व भ्रष्ट नेत्यासाठीचे माहेरघर, त्यामुळे खडसेंचा पक्ष प्रवेश आश्चर्यकारक नाही’
- ‘अनिल देशमुख यांनी ‘तो’ निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपाच्या पोटात गोळा उठला आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
