🕒 1 min read
मुंबई- भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर आता मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन या दुपारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन स्वागत करतील.
गीता जैन यांच्या सेनेत प्रवेश करण्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. भाजपमध्ये बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे भाजपला एकप्रकारे हा धक्का मानला जात आहे.
मीरा-भाईंदर मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन या आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. आज दुपारी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कालच खडसे यांनी भाजपला राम राम ठोकला. माझ्यावर अन्याय झाला, माझी बदनामी करण्यात आली, भाजपामध्ये संधी मिळेल याची अपेक्षा नव्हती, म्हणून निरपेक्ष भावनेनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं. भाजपाचं काम ज्या निष्ठेनं केलं त्याच निष्ठेनं आणि दुप्पट वेगानं राष्ट्रवादी काँग्रेसचं करेन, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आणखी वाढ ! अजून एक तक्रार दाखल
- बिहारमध्ये सत्ता नाही आली तर भाजपा गोर गरिबांकडून लसीचे पैसे घेणार का?
- कौतुक तर व्हायलाच पाहिजे ! भारतीय नौदलात महिला वैमानिकांची पहिली तुकडी कार्यरत
- ‘राष्ट्रवादी सर्व भ्रष्ट नेत्यासाठीचे माहेरघर, त्यामुळे खडसेंचा पक्ष प्रवेश आश्चर्यकारक नाही’
- ‘अनिल देशमुख यांनी ‘तो’ निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपाच्या पोटात गोळा उठला आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
