Share

‘बिग बॉस’ फेम कुशाल टंडनचे पावसामुळे झाले मोठे नुकसान

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा आणि मुंबईसह कोकणात देखील अनेक भागात पाणी साचले असल्याचे दिसत आहे. काही गावातील अनेक सखल भागात घरांमध्ये तसच बाजारपेठेत पाणी शिरलं  आहे. अशी एकंदरीत भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा फटका सामान्य माणसासह सेलीब्रीटीना देखील बसला आहे.

‘बिग बॉस’ फेम कुशाल टंडनला पावसामुळे आर्थिक फटका बसला आहे. गेल्याच वर्षी मुंबईत त्याने एक रेस्टोरेंट सुरू केलं होतं. मुसळधार पावसाने त्याच्या या नव्या कोऱ्या रेस्टोरेंटची दुरावस्था झाली असल्याची माहिती त्याने एक व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

Kushal-Tandon-Restaurant

‘बिग बॉस’ फेम कुशाल टंडनने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला. सोबतच रेस्टोरेंटचे काही फोटोज सुद्धा त्याने शेअर करत त्याने लिहिले की, ‘धन्यवाद, मुंबईच्या पावसा, माझ्या रेस्तरॉंची अशी अवस्था करण्यासाठी, यासाठी करोना कमी पडला होता ना. मग तू हे करून दाखवलं. या कहाणीतील एक चांगली गोष्ट आहे की यात वॉचमनला आणि सिक्यूरिटी गार्डला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही’. असे त्त्याने सांगितले आहे.

कोरोना काळात आधीच त्याचे नुकसान झाले होते. त्यातच आता पावसामुळे त्याला जवळपास २० ते २५ लाखांचं नुकसान झालं असल्याचा सांगण्यात येत आहे. कुशाल टंडनने ‘बिग बॉस’ मध्ये झळकला होता. बिग बॉसमध्ये त्याची गौहर खानसोबत चांगलीच चर्चा झाली होती. तसेच त्याने अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!