Share

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचे बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “ज्यांनी शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयी…”

Published On: 

🕒 1 min read

Jitendra Awhad |  मुंबई : हर हर महादेव (har har mahadev) सिनेमाचा वाद चांगलाच पेटताना दिसत आहे. अशातच आता  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिवंगत लेखक बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप केले आहेत. “जेम्स लेनने शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयीच शंका निर्माण केली. त्यात त्यांना बाबासाहेब पुरंदरे यांनी मदत केली,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच असं असूनही पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला असल्याचंही त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हंटल.

“स्वतःच्या सत्तेची बुज राखण्यासाठी मराठे आपल्या आयांनाही पाठवायला कमी करणार नाहीत”, असं पुरंदरे सांगतात. असे अनेक प्रसंग आहे ज्यात शिवाजी महाराजांची उंचीच कमी करण्यात आली. या सगळ्याचा राग आमच्या मनात आहे आणि कायमचा असेल, असं सांगत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यावर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण बाबासाहेब पुरंदरेंच्या परंपरेतील आहे. त्यांनी शिव छत्रपती लोकांच्या डोक्यावर मारला. तेव्हा बहुजन समाज अशिक्षित होता, त्याला अक्षरओळख नव्हती. त्यामुळे तो इतिहास चालत आला. मात्र, त्याच माध्यमातून जेम्स लेनची अनावरस औलादीने शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयीच शंका निर्माण केली. त्यात त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे ऋणनिर्देश केलेत.”

दरम्यान, “ शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत अकारण गोंधळ निर्माण केल्याबद्दल ब. मो. पुरंदरे यांच्याकडून पंढरपूरमध्ये अक्षरशः माफीनामा लिहून घेतला गेला. जेम्स लेनला हाताशी धरून आई जिजाऊंची बदनामी करणाऱ्या संस्थांना योग्य धडा शिकवला गेला. आणि तिथे हे स्पष्ट झाले की इथून पुढे शिवाजी महाराजांच्या बाबतीत कुणाला खोटा इतिहास लिहिता येणार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!