🕒 1 min read
कानपूर : कानपूर येथे भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि आता दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. वृत्तानुसार, वानखेडेच्या खेळपट्टीवर हिरवे गवत सोडले जात असून, त्यामुळे फिरकीपटूंना फारसा फायदा होणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबई कसोटी सामन्यात वापरण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मैदानाच्या खेळपट्टीवर गवताचा जाड थर असल्याचे सांगण्यात आले आहे. फिरकी गोलंदाजांचा चेंडू फारसा वळणार नाही. गवत आणखी वाढलेले दिसते आहे. कारण जानेवारी 2020 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यानंतर वानखेडे स्टेडियमच्या मुख्य तीन खेळपट्ट्यांवर कोणतेही क्रिकेट खेळले गेले नाही. त्यातील काही गवत कापले जाईल, परंतु या टप्प्यावर जेव्हा कसोटी सामना अवघ्या काही दिवसांवर आहे तेव्हा तुम्ही जास्त गवत कापू शकत नाही. त्यामुळे रविवारपासून त्यांनी खेळपट्टीला पाणी देणेही बंद केले आहे.
मुंबईत सध्या पावसाळा सुरू आहे. दर दुसऱ्या दिवशी पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांतही पावसाची शक्यता आहे. याचा अर्थ खेळपट्टीवरील आर्द्रता आणखी वाढेल जी सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी दिसून येईल. या संदर्भात सूत्रांनी सांगितले की, ‘यामुळे गवत आणि विकेटमध्ये ओलावा येईल. सकाळच्या आर्द्रतेसह विकेट वेगवान गोलंदाजांना सामन्याच्या सुरुवातीला मदत करेल, परंतु नंतर तो एक चांगला फलंदाजीचा ट्रॅक बनेल. भारतीय खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीसाठी अधिक उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे मुंबई कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.
महत्वाच्या बातम्या:
- किरॉन पोलार्डला मुंबई इंडियन्ससोबत कायम ठेवण्याचे मोठे कारण आले समोर
- …त्यामुळे ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता- प्रविण दरेकर
- सनरायझर्स हैदराबादच्या प्रशिक्षकानेही घेतला संघाचा निरोप
- राहुल पाठोपाठ पंजाबला आणखीन एक मोठा धक्का; सहाय्यक प्रशिक्षकाने दिला राजीनामा
- …यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत का?- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
