नवी दिल्ली : पंजाब किंग्ज (Punjab Kings)ला केएल राहुल (KL Rahul) पाठोपाठ आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्जचे सहाय्यक प्रशिक्षक एंडी फ्लावर (Andy Flower) यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. झिम्बाब्वेचे माजी खेळाडू आयपीएल 2022 पूर्वी नवीन संघांपैकी एकात सामील होण्याची अपेक्षा करत आहेत. त्यांच्याकडे कोचिंगचा भरपूर अनुभव आहे आणि ते कोणत्याही संघासाठी मोठी संपत्ती ठरू शकतात. पंजाब संघातून जवळपास सर्वच खेळाडूंना मुक्त करण्यात आले आहे. यावेळी केवळ दोनच खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे.
प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फ्लॉवर यांनी नुकताच राजीनामा पाठवला आहे. त्यांना नवीन संघांसोबत काम करायचे असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. गेल्या दोन हंगामात एंडी फ्लावर यांनी अनिल कुंबळेसोबत हातमिळवणी केली आहे. याशिवाय ते कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये कोचिंगशीही जोडले गेले आहेत. अशा प्रकारे त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. मेगा लिलावापूर्वी किंवा नंतर ते कदाचित इतर आयपीएल संघासह दिसू शकतात.
आयपीएलच्या नवीन हंगामापूर्वी आयोजित रिटेनशन कार्यक्रमात पंजाब किंग्जने त्यांचे दोन खेळाडू वगळता सर्वांना सोडले आहेत. मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग यांना अनुक्रमे 12 कोटी आणि 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. अर्शदीप हा अनकॅप्ड खेळाडू आहे त्यामुळे त्याला ही रक्कम मिळाली आहे. त्याने भारतासाठी एक सामना जरी खेळला असता तरी त्याची रक्कम दुप्पट होऊ शकली असती.
महत्त्वाची बाब म्हणजे केएल राहुललाही संघातून वगळण्यात आले आहे. कदाचित तो दुसऱ्या संघात सामील होईल. अशा प्रकारे यावेळी मयंक अग्रवालला कर्णधार बनवले जाऊ शकते. केएल राहुलला सोडण्याच्या बातम्या यापूर्वीही येत होत्या. अशा स्थितीत पंजाब किंग्जने आपल्या खेळाडूंना कायम ठेवण्याची घोषणा करून या बातमीवर शिक्कामोर्तब केला. आता मेगा लिलावात संघाच्या नजरा मोठ्या नावांवर असतील.
महत्वाच्या बातम्या
- एसटी महामंडळाचा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू
- सरकारचे ‘हे’ निर्बंध केंद्रीय आरोग्य विभागाने देशभरासाठी लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणारे
- औरंगाबादेत चक्क स्मशानभूमीतच केली बेकायदेशीर प्लॉटिंग!
- मी अनिल देशमुखांना कधी भेटलो ते मला आठवत नाही; सचिन वाझेची साक्ष
- ‘आदित्य ठाकरे माणुसकी जपा, आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो’


