Share

…त्यामुळे ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता- प्रविण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बुधवारी(१ डिसें.) तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) मुंबई दौऱ्यावर होत्या. परंतु त्यानंतर आता ममता यांच्यावर मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी भाजपा नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देत भाजप नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) म्हणाले की,’ममता बॅनर्जी यांनी या राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. आपल्या देशाचा अवमान करण्याचे काम ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रगीताच्या संदर्भात जो काही कायदा आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. कारण राष्ट्राभिमान महत्त्वाचा आहे. राष्ट्रगीत महत्त्वाचे आहे आणि त्याविषयी ममता बॅनर्जी इतक्या निष्काळजी असतील तर हे चुकीचे आहे. राजकारण यांना देशहितापेक्षा मोठे वाटत आहे. या सर्वांमध्ये त्यांनी राष्ट्रगीताला दुय्यम स्थान दिले आहे. याची शिक्षा देशाने आणि आपल्या राज्याने त्यांना दिली पाहिजे. पोलिसांनी ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करावा.’

दरम्यान, ममता यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर काही सेकंदात त्या खुर्चीवरून उठताना दिसत आहेत. तर ‘द्रविड उत्कल बंग’ नंतर त्यांनी जय महाराष्ट्र, जय बिहार आणि जय भारत म्हणत राष्ट्रगीत गाणे थांबवले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!