🕒 1 min read
नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचे प्रशिक्षक ट्रेवर बैलिस (Trevor Bayliss) यांनीही संघाचा निरोप घेतला आहे. ते सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने ही घोषणा केली आहे. आता संघ नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. एका वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, सनरायझर्सच्या एका अधिकाऱ्याने बैलिस यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. आणि आम्ही लवकरच नवीन प्रशिक्षकाची घोषणा करू. असेही संगीतले आहे.
बैलिस यांनी 2019 च्या विश्वचषकानंतर लगेचच हैदराबाद संघाची जबाबदारी स्वीकारली होती. पण सनरायझर्सकडून त्यांना पूर्ण यश मिळाले नाही. एकदा (2020 मध्ये) तिसरे स्थान मिळवल्यानंतर, 2021 मध्ये संघ तळाला गेला. मागील वर्षीची कामगिरी पाहिल्यानंतर हैदराबाद संघातील जवळपास सर्वच मोठी नावे बाहेर पडली आहेत.
केन विल्यमसन हे एकमेव मोठे नाव आहे जे संघाने पुन्हा कायम ठेवले आहे. त्याच्याशिवाय अब्दुल समद आणि उमरान मलिक यांना कायम ठेवण्यात आले आहे. गेल्या आयपीएलमध्ये दोघांनी दमदार कामगिरी केली होती. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनाही ठेवण्यात आलेले नाही. राशिद खानलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Presenting the 2️⃣ #Risers along with Captain Kane who will continue to don the #SRH colours in #IPL2022 ????
We enter the auction with a purse of INR 68 crores. #OrangeArmy pic.twitter.com/2WwRZMUelO
— SunRisers Hyderabad (@SunRisers) November 30, 2021
गेल्या आयपीएलमध्ये हैदराबाद संघासाठी काहीही योग्य झाले नाही. पहिल्या टप्प्यात डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. केन विल्यमसनच्या आगमनानंतरही विशेष फरक पडला नाही. यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या लीगमध्येही हैदराबादने अशीच कामगिरी केली आणि गुणतक्त्यात तळाला स्थान मिळविले.
महत्वाच्या बातम्या
- एसटी महामंडळाचा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू
- सरकारचे ‘हे’ निर्बंध केंद्रीय आरोग्य विभागाने देशभरासाठी लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणारे
- औरंगाबादेत चक्क स्मशानभूमीतच केली बेकायदेशीर प्लॉटिंग!
- मी अनिल देशमुखांना कधी भेटलो ते मला आठवत नाही; सचिन वाझेची साक्ष
- ‘आदित्य ठाकरे माणुसकी जपा, आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
