मुंबई : अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून निर्मात्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता मालिकेतून काढून टाकण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. अलिकडेच आता किरण माने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
दरम्यान ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याबद्दल किरण माने शनिवारी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांना भेटणार असल्याचे म्हटले जात आहे. आता शरद पवार या प्रकरणावर प्रतिक्रिया देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड (NCP’s Jitendra Awhad), रोहित पवार (Rohit Pawar) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या प्रकणावर प्रतिक्रिया देत किरण माने यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शरद पवार यांची या प्रकरणावर काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या सोशल मीडिया, राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या सगळ्या वादानंतर ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या निर्मात्यांकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. किरण माने यांना राजकीय भूमिका घेतल्यामुळे मालिकेतून काढण्यात आलेले नाही. त्यांच्यावर व्यावसायिक कारणांमुळे कारवाई करण्यात आल्याचे मालिकेच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पुण्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात वाढले १० हजाराहून अधिक रुग्ण
- वादग्रस्त व्यक्तींसोबत नात, सलमानसोबत जवळीक; जॅकलिनच्या अफेअरची मोठी यादी
- औरंगाबादकरांसाठी सुखावह बातमी; लवकरच होणार खाम नदीचे लोकार्पण!
- फडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा? रुपाली ठोंबरेंचा टोला
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका


