🕒 1 min read
पुणे – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला असून मूळ मुद्दा बाजूला राहतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
काल भाजप खासदार नारायण राणे यांनी खासदार शरद पवार यांच्यावर शरसंधान केले आहे. नारायण राणे यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षण प्रश्नी भाष्य करत एकप्रकारे शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले व पवार यांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे अशी मागणी केली. मराठा आरक्षणाबाबत भाजप गंभीर असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुढील दिशा निश्चित करण्यासाठी भाजपने पाच वकिलांची नेमणूक केली आहे. या विषयात राज्य सरकारलाही आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत’, असे राणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी शिवसेनेवर देखील टीका केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला शिवसेनेचा कधीच पाठिंबा नव्हता. त्यामुळे आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निष्काळजीपणा दाखविला, अशी टीका नारायण राणे यांनी गुरुवारी येथे केली. मातोश्री बाहेर न पडणाऱ्या व्यक्तीला काय कळणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आरक्षण न मिळण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोपही केला.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेते अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये ‘मामा’ म्हणण्याचा आहे एक भन्नाट किस्सा
- संभाजीराजेंची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत – राणे
- हिजाब घातल्याने खिल्ली उडवणाऱ्या युझरला सना खानने दिले सडेतोड उत्तर
- शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प – जयंत पाटील
- ‘तळागळातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हीच गोपीनाथजींना श्रध्दांजली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
