Share

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला! कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंग सिद्धू आमने-सामने

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना संकटात पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंजाब कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे. त्याची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेतली असून तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.

दरम्यान, अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्यासह पंजाबचे 25 मंत्री, आमदार रविवारीच दिल्लीत दाखल झाले असून आजपासून समितीसमोर आपली बाजू मांडत आहेत. यात काँग्रेसच्या किमान २४-२५ आमदार ज्यात प्रदेशाध्यक्ष सुनील झाखडं, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंग रंधावा यांचा समावेश आहे.

निवडणुकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आता पक्षाच्याच आमदारांनी स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडीवर असलेले पंजाब काँग्रेसचे नेते व आमदार नवज्योत सिंग सिद्धू यांचा देखील यामध्ये समावेश होता. या पॅनलशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रया दिली.

“मी इथं तळागाळातील लोकांचा आवाज हायकमांडकड पर्यंत पोहचवण्यासाठी आलो आहे. लोकशाही सत्तेबाबतची माझी भूमिका तशीच आहे. जनतेचे अधिकार जनतेला परत मिळाले पाहिजे. मी स्पष्टपणे सत्य सांगितलं आहे.” असं सिद्धू यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!