मुंबई : काही दिवसापुर्वी इंग्लंड आणि श्रीलंका संघादरम्यान टी-२० मालिकेतील सामनाधीकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आज ६ जुलै रोजी समोर आलेल्या माहीतीनुसार इंग्लंड क्रिकेट संघाचे तीन खेळाडू आणि टिम मॅनेजमेंटच्या चार आशा एकुण सात सदस्यांना कोरनाची लागण झाली आहे.
कोरोनाची लागण झालेले खेळाडू हे ४ जुलै पासुन इंग्लंड सरकारने दिलेल्या नियमानुसार विलगीकरणात उपचार घेत आहे. तर लागण झालेल्या इतर सदस्यांना विलगीकरणात ठेवले असुन वैद्यकीय टीम त्यांच्यावर बारकाईने लक्ष देऊन आहे. यादरम्यान रॉयल लंडन एकदिवीसीय, व्हिटॅलीटी ब्लास्ट टी-२० स्पर्धा आणि पाकिस्तान विरुद्धची मालिका ठरल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.
The ECB can confirm that seven members of the England Men's ODI party have tested positive for COVID-19.
— England Cricket (@englandcricket) July 6, 2021
पाकिस्तान संघाविरुद्ध इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल आणि त्यांच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. संघाची घोषणा येत्या काही वेळात केली जाईल असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांच्या वन खात्यात बदल्यांसाठी रेट कार्ड’ ; फडणवीसांचा गंभीर आरोप
- ‘आर्यन मॅनने मॅसेजची दखल न घेतल्याने नाराज होते’ तापसी पन्नू
- ‘आमदारांना निलंबित करून तुम्ही बालिशपणा केलाय, लढायंच असेल तर या मैदानात!’, निलेश राणेंचे आव्हान
- ‘अभिरूप विधानसभा भरवणाऱ्या भाजप सदस्यांवर कारवाई करा’, जयंत पाटलांची मागणी
- भारत विरुद्ध श्रीलंका मालिका सुरू होण्यापूर्वीचं ‘या’ खेळाडूचं निलंबन


