मुंबई : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यवर हि कारवाई करण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी सुद्धा भाजपच्या आमदारांनी तुफान राडा घातला आहे. विधानभवनाच्या बाहेर भाजपकडून आंदोलन सुरू आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून भाजपचे प्रतिविधानसभा भरवली होती. पण, माईक आणि टेबल हटवल्यामुळे वाद चिघळला होता. त्यानंतर पत्रकारांच्या दालनात भाजपने प्रतिविधानसभा भरवून ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
‘मुख्यमंत्री महोदय तुमच्या नाकाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या यांच्या वन खात्यात बदल्यासाठी रेट कार्ड झाले असून ५-१० लाख घेतात. मी मुख्यमंत्री ठाकरे पैसे घेतात असं म्हणणार नाही पण त्याच्या खात्यात रेट कार्ड काम सुरू आहे, यावर कारवाई करणार का ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थितीत केला.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘जे मुघल, इंग्रज यांना जमले नाही ते या सरकारने करून दाखवली, वारकरी लोकांना अटक केली जात होती. सर्व जबाबदारी केंद्र सरकारची मग राज्य सरकार काय भजी तळायला ठेवलं का? वसुलीच काम प्रत्येक काम सुरू खात्यात, प्रत्येक खात्यात वाझे आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझ्यावर आरोप म्हणजे राज्य सरकारवर आरोप, मला क्लीनचिट द्या’; सरनाईकांची मागणी
- आमदारांवर कारवाई केल्याने विधानभवन परिसरात भाजपची ‘अभिरूप विधानसभा’
- ‘आमदारांना निलंबित करून तुम्ही बालिशपणा केलाय, लढायंच असेल तर या मैदानात!’, निलेश राणेंचे आव्हान
- ‘अभिरूप विधानसभा भरवणाऱ्या भाजप सदस्यांवर कारवाई करा’, जयंत पाटलांची मागणी
- भारत विरुद्ध श्रीलंका मालिका सुरू होण्यापूर्वीचं ‘या’ खेळाडूचं निलंबन

