Share

मोठी बातमी! लालपरीचा प्रवास महागला; आज मध्यरात्रीपासून १७ टक्के भाडेवाढ होणार

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मागील काही काळापासून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा फटका राज्यातील एसटीला बसत आहे. यामुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव पाठवला होता. एसटीच्या या प्रस्तावाला सरकारकडून आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपासून ( मंगळवार, दि.२६) राज्यभरात एसटीच्या दरात सतरा टक्क्यांची वाढ होणार आहे. ही दरवाढ दिवाळीच्या तोंडावर होत आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार एकूण प्रवासभाड्यात १७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिकिलोमीटरमागे २१ पैशांची वाढ होणार आहे. ‘केंद्र सरकारचं डिझेल दरावर नियंत्रण नसल्याने हे दर सातत्याने वाढत आहेत. परिणामी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे,’ असं स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून देण्यात आलं आहे. पेट्रोलच्या किंमती प्रतिलिटर ११३ रुपयांवर, तर डिझेलचे दर १०० रुपयांवर गेल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दरवाढ अटळ होती. मात्र, ही दरवाढ दिवाळीच्या तोंडावर होईल, अशी अपेक्षा नव्हती.

गेल्या वर्षभरापासून राज्यातील परिवहन बस तोट्यात होती. कर्मचाऱ्यांच्या पगारीही वेळेवर होत नव्हत्या. एसटी प्रशासन तोट्यात असण्याचे एक कारण म्हणजे ज्या प्रमाणात डीझेलच्या किंमती वाढल्या होत्या त्याप्रमाणात तिकीट दर वाढले नव्हते. यासाठी एसटी प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यामुळे मंगळवारपासून राज्यभरात एसटी तिकिटाचे दर सतरा टक्क्यांनी वाढणार आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली असतानाच आता एसटी महामंडळानेही भाडेवाढीचा निर्णय घेत त्यात तेल ओतले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने घेतलेला हा निर्णय गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसह, नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी तापदायी ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!