मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मात्र, अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली होती. यामध्ये महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. याबाबतची नियमावली काही तासातच सरकार जाहीर करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेली आहे. तर उद्या रात्री ८ वाजल्यापासून हा कडक लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीमध्ये केलेली आहे.
दरम्यान, गर्दी कमी होत नसल्याने राज्य शासनाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील.सकाळी 11 वाजता दुकाने बंद झाल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत या दुकानांद्वारे घरपोच सुविधेला मात्र परवानगी असेल असं सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील. या आदेशाची अंमलबजावणी 20 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निर्णय झाला, आदेश आलेच नाहीत औरंगाबादेत दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरूच!
- जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीसह अविनाश जाधवांचे ठाण्यात ठिय्या आंदोलन
- धक्कादायक! औरंगाबादेत एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही
- जवळचा की दूरचा? ‘तन्मय’ प्रकरणी राष्ट्रवादीने काढली देवेंद्र फडणवीसांची वंशवेल
- उस्मानाबादच्या सत्तर गावात कोरोनाची ‘दस्तक’


