Share

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणासाठी आता ‘मध्यप्रदेश पॅटर्न’, भुजबळ म्हणाले…

Published On: 

मुंबई : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वच राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. दरम्यान, हा तिढा सोडवण्यासाठी आता राज्यातील आघाडी सरकार मध्यप्रदेश पॅटर्न (madhya pradesh pattern) लागू करणार आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले की, ‘ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वच राज्यांमध्ये निर्माण झाला असून केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला आणि देशपातळीवर निर्णय घेतला तर सर्वच राज्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो.’ पुढे मध्यप्रदेश पॅटर्न संदर्भात बोलतांना भुजबळ म्हणाले की,‘ट्रिपल टेस्ट शिवाय आरक्षण देता येणार नाही हा निकाल सर्व देशाला लागू झाला. त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसीशिवाय काही ठिकाणी निवडणूक झाली. मध्यप्रदेश, ओरिसा, कर्नाटकालाही तोच कायदा लागू झाला. त्यावेळी मध्यप्रदेशने अध्यादेश काढला. निवडणूक आयोगाचे काही अधिकार स्वत:कडे घेतले आणि निवडणूक आयोगाकडे केवळ निवडणूक घेण्याचे अधिकार ठेवले, असे भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, या संदर्भात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थित राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!