पिंपरी चिंचवड : देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातले असून राज्यात आणि त्यातही पुणे जिल्ह्यात असणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्याने प्रशासनाची देखील चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. यामुळेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्व प्रयत्न करत आहे.
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना नियम पाळावे म्हणून सक्ती केली जात असताना दुसरीकडे राजकीय नेते मात्र या नियमांना पायदळी तुडवताना दिसून येत आहेत. सध्या भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार महेश लांडगे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ते कोरोना नियमांची पूर्णपणे पायमल्ली करत असल्याचे समोर आले आहे.
मुलीच्या लग्न समारंभातील मांडव टहाळ्याचा कार्यक्रमात महेश लांडगे आणि त्याच्या समर्थकांनी हळद उधळत भंडाऱ्यात नाहून डान्स केला आहे. यावेळी आमदारा महेश लांडगे यांना खांद्यावर घेऊन वाजंत्रीच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी एकच ठेका धरला होता. तर, आजूबाजूला भंडाऱ्याची उधळण होत होती. काही सेकंदाच्या डान्स मोबाईलमध्ये टिपण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
महेश लांडगे यांच्या मुलीचा विवाहसोहळा 6 जूनला होणार आहे. त्यापूर्वीच मांडव टहाळ्याचा कार्यक्रम पार पडला होता. या सोहळ्यात अपवाद वगळता आमदारांसह सगळेच विनामास्क वावरताना या व्हिडीओत दिसत आहेत. या व्हिडीओत सोशल डिस्टनसिंगचा देखील फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, आता सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे प्रशासन लांडगे यांच्याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यासंबंधी काय कारवाई करणार? असा प्रश्न सर्वसमान्यांमधून उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने केला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी राज्यसरकार कटीबध्द – अजित पवार
- मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल – सामना

