नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर मधील घरावर ईडीने छापा टाकला आहे. देशमुख यांच्या घरावरील महिनाभरानंतरचा हा दुसरा छापा आहे. या आधी देखील सीबीआयने त्यांच्या घरावर छापा टाकला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केल्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. ईडीच्या छाप्यामुळे देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसूलीचे टार्गेट दिले असल्याचा आरोप सिंह यांनी आपल्या पत्रात केला होता. त्यानुसार आधी सीबीआय आणि आणि आता ईडीने ही छापेमारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर देशमुखांवर गुन्हा दाखल झाला होता. ईडीने सकाळी पावणे आठच्या सुमारास हा छापा टाकला आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. छापेमारीच्या वेळी अनिल देशमुख घरी नाहीत मात्र, त्यांच्या घरातील इतर सदस्य घरातच असल्याची माहिती मिळाली आहे. या आधी सीबीआयच्या छाप्यात देशमुखांच्या घरातील काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्या वेळी एकाच वेळी १० ठिकाणी छापे मारले होते. निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला अनिल देशमुख यांनी वसूली करण्याचे सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. तेव्हापासून देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंच्या ‘बीड पॅटर्न’वर आमदार सुरेश धसांची टीका, म्हणाले… हा तर ‘उलटा पॅटर्न’
- ‘माझ्याहून उत्तम दिग्दर्शक कुणीच असू शकत नाही’
- 38 वर्षे विश्वविजयाची! वेस्ट इंडीजला नमवून आजच पटकावला होता पहिला वर्ल्डकप
- कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह तंत्रज्ञानाचे धडे
- कॅप्टन कुल ‘माही’ शिमल्यात लुटतोय थंड हवेचा आनंद : पहा फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

