Share

Chandrashekhar Bawankule | “बैठकांवर अजित पवारांनी बोलू नये, त्यांना शोभत नाही” ; बावनकुळेंचा पलटवार

Published On: 

🕒 1 min read

Chandrashekhar Bawankule | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसेभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) आल्यापासून म्हणावे तसे काम होताना दिसत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झालं आहे.  सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड तणावाखाली काम करत आहे. आधीच्या सरकारच्या काळात व्हायच्या तशा बैठका देखील होत नाहीत, असे अजित पवार म्हणाले यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांनी पलटवार केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) अस्वस्थतेमध्ये बोलत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून सरकारवर आरोप करण्याकरीता केवळ केवीलवाणी धडपड आहे, असे मला वाटते. ज्या सरकारच्या बैठकी होत नव्हत्या. ज्या सरकारमध्ये फेसबुक लाईव्ह होत होते. ज्या सरकारमध्ये कॅबीनेटच्या बैठकी फेसबुकवर होत होत्या. अधिकाऱ्यांच्या बैठकी तर सोडाच. त्यामुळे या लोकांनी बैठकांवर बोलू नये. अडीच वर्षात जेवढे निर्णय घेतले नाहीत तेवढे तीन महिन्यात फडणवीस-शिंदे सरकारने घेतले.

“अजित पवार यांनी एवढ्या लहान विषयावर बोलू  नये. त्यांना हे शोभत नाही. अडीच वर्षाच्या सरकारच्या काळात तुम्ही कमजोर होते. मुख्यमंत्री कमजोर होते. तुम्ही आकासाचं राजकाण केलं. सत्तेचा वापर केवळ आपला पक्ष वाढवण्याकरीता केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गरज नसताना अशा कार्यकर्त्यांना सुरक्षा दिल्या. बलात्कार झाले, त्याचे समर्थन तुम्ही केले. विनयभंग झाले त्याचे समर्थन केले. तुमच्या समर्थनाचा रेकॉर्ड काढला तर तुम्ही या महाराष्ट्राला संस्कृतीला शोभत नाही,” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली.

बावनकुळे म्हणाले, आता आठरा अठरा तास काम करणारे करणारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे चांगले नेते महाराष्ट्राला मिळाले. या महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेला सुरक्षा कवच आहे. गुंडशाहीला लगाम लागला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!