Share

मोठी बातमी : राज्यात कोरोनाचा उद्रेक; राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात तब्बल १५ हजार ५१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, राज्यात आता तब्बल १ लाख ३० हजार ५४७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने विविध जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे.

तर, अनेक शहरांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल चालकांपासून ते राज्यातील सामान्य जनतेपर्यंत सर्वांनाच काटेकोरपणे कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. आता, राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पुन्हा एकदा हॉटेल्स, सिनेमागृह हे ५० टक्क्यांनीच सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नवी नियमावली –

  1. लग्न समारंभासाठी 50 लोकांना परवानगी असेल तर अत्यंसंस्कारात 20 पेक्षा जास्त जणांना परवानगी नाही.
  2. राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
  3. राज्यातील सर्व रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र यावेळी नियम अधिक कडक करण्यात आले असून मास्क शिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी नसेल. याशिवाय आस्थापनांमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायजर लावणं ही बंधनकारक करण्यात आलं आहे. दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्यास कोरोना महासाथ जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असंही गाइडलाइन्समध्ये जारी करण्यात आलं आहे.
  4. तसेच, शॉपिंग मॉल्सनाही हे नियम अनिवार्य राहतील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!