🕒 1 min read
मुंबई : कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून भारतात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांना करोनाची लागण होत आहे. त्यातच आता आणखी एका मंत्र्याला करोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांना करोनाचा संसर्ग झाला आहेच वडेट्टीवार हे सध्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाले आहे. त्यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात हण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनात विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तिर्थक्षेत्रातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे.जे. रुग्णालयात घेतला कोरोना लसीचा डोस
- अखेर कावासाकी निंजा 300 ही बाईक लाँच !जाणून घ्या किंमत
- मोबाईल टॉवर्सकडे कोट्यवधी थकित, पालिका नेमणार खासगी एजन्सी
- रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफात लस…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
