Share

ईडीचे पथक घरी पोहोचताच आनंदराव अडसूळांंची तब्येत खालावली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Published On: 

अमरावती : राज्यात ईडीचे सत्र सुरुच असून अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले होते. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी ईडीचं एक पथक त्यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं. यावेळी अडसूळ यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेनं थेट रुग्णालयात नेण्यात आलं. मुंबईतील लाईफ लाईन मेडिकेअर या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इडीच्या पथकाने त्यांच्या घरी धाड टाकली. मात्र, यावेळी आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने एम्ब्युलन्स बोलाविण्यात आली. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले आहे.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून संघर्ष सुरू आहे. सिटी बँकेतील ९०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसूळांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. ईडीने बजावलेल्या या समन्सवर अडसूळ यांनी उत्तर दिल्याचं कळतंय.

आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती रवी राणा यांनी दिली होती. पण आनंदराव अडसूळ यांना कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही. ही रवी राणा यांनी पेरलेली माहिती आहे, असं आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी म्हटले होते.

अडसूळ यांच्यावरील आरोप
५ जानेवारी रोजी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटाळा केल्याचा आरोप केला. अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्र सादर करण्यासाठी राणा ईडीच्या कार्यालयातही गेले होते. मुंबईमध्ये सिटी को-ऑप बँकेच्या १३ ते १४ शाखा आहेत. या बँकेत ९०० खातेदार असून ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटण्यात आलेलं कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणा यांच्याकडून करण्यात आला होता. अडसूळ यांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. खातेदारांना फक्त एक हजार एवढी रक्कम मिळत असल्याचंही रवी राणा यांनी आपल्या आरोपात म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!