Share

Chitra Wagh | “…त्यामुळे अजित पवार सुप्रिया सुळे शिवीगाळ प्रकरणावर बोलले नाहीत” ; चित्रा वाघ यांचा खुलासा

Published On: 

Chitra Wagh on Ajit Pawar | वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीतील सर्व नेते सत्तारांच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत. राज्यभर आंदोलन सुरु आहेत. मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार – शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अजित पवार का बोलले नाहीत यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खुलासा केला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, अजित पवार हे आमच्यासाठी आदरणीय स्थान आहेत. त्यांना माहिती आहे की सन्मान फक्त त्यांच्या बहिणीचा नाही तर राज्यातील प्रत्येक महिलांचा झाला पाहिजे. त्यामुळेच ते अब्दुल सत्तार यांनी टीका केलेल्या प्रकरणावर बोलले नाहीत. मी त्यांच्यासोबत काम केलेले आहे. त्यांची काम करण्याची स्टाईल मला माहिती आहे. ते जरी विरोधी पक्षात असले तरी त्यांच्यासाठी आमच्याकडे हायरिस्पेक्ट आहे.”

संपूर्ण राज्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आहे. मात्र अजित पवार नॉट रीचेबल आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तारांनी अपशब्द वापरले आणि अजित पवारांनी साधे ट्वीट देखील केले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील सभेपासून अजित पवार नॉट रीचेबल आहेत.

अजित पवार कधी कोणती भूमिका घेतील याबद्दल काही नेम नाही –

“अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची बाजू का घेतली नाही. याबद्दल चर्चा सुरु आहे. पण मला वाटते तो भाऊ-बहीणीचा प्रश्न आहे. मात्र अजित पवार कधी कोणती भूमिका घेतील याबद्दल काही नेम नसतो. त्यांच्या भुमिकेचा अंदाज व्यक्त करता येत नाही,”  असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

दया कुछ तो गडबड है-

मनसे नेते गजानन काळे म्हणाले, “महाराष्ट्रासमोर इतके प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र महाराष्ट्रातील शॉडो मुख्यमंत्री ज्यांना म्हटले जाते ते विरोधी पक्ष नेते अजित  पवार काही दिवसापासून शांत असल्याचे आपण बघितले. इतकं की राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात तब्येत बरी नसताना शरद पवार उपस्थिती लावतात. मात्र काही वयक्तिक कारण सांगून अजित पवार हे अनुपस्थित होते. दया कुछ तो गडबड है,  एवढे मात्र नक्की”, असे गजानन काळे म्हणाले.

“काल परवा अब्दुल सत्तार सारखा एक मंत्री सुप्रिया सुळे यांच्यावर इतक्या गलिच्छ भाषेत, शिवराळ भाषेत बोलतो. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचा निषेध केला जातो. मात्र विरोधी पक्ष नेत्याच्या ट्विटर अकाउंटवर सुध्दा याची साधी प्रतिक्रिया दिसत नाही. कुठल्या मीडियाला सुध्दा अजित पवार यांनी निषेध नोंदवला आहे, हे दिसत नाही”, अशी प्रतिक्रीया गजानन काळे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!