पुणे : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. असं असलं तरी संभाव्य तिसऱ्या लाट आणि डेल्टा प्लस व्हेरियंट प्रसार हे अधिक धोकादायक असल्याने राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत.
तर, पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु होती. दिवसाला ७-८ हजारांच्या घरात गेलेली पुणे शहरातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही २००-३०० पर्यंत आली होती. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, आता पुन्हा एकदा पुणे शहराच्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे.
आज (दि. ३० जून) रोजी पुणे शहरात तब्बल ५०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७८ हजार ५१७ इतकी झाली आहे. शहरातील २६६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६७ हजार ३७२ झाली आहे.
आजच्या रुग्णवाढीमुळे सक्रिय रुग्णसंख्या ही अडीच हजारांवर गेलीये. पुणे शहरात सध्या २५५७ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २८७ रुग्ण गंभीर तर ४२२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आघाडीत मोठे वाद आणि संशय; शिवसेनेनं भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे’
- ‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामे करता का?’, हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापले
- ‘अजित पवार तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही; २०२४ च्या पराभवाआधीच तुम्ही जेलमध्ये असाल’
- राजस्थान भाजपमधील अंतर्गत वादाचा कॉंग्रेसला होतोय चांगलाच फायदा
- पुणे झालं अजून मोठं; शहराच्या हद्दीत तब्बल २३ गावांचा झाला समावेश


