🕒 1 min read
जयपूर – राजस्थानमधील काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असताना दुरीकडे भाजपमध्ये देखील शीतयुद्ध सुरु असल्याचं आता समोर येवू लागले आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया समर्थक आणि प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्यामध्ये हे शीतयुद्ध सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अडीच वर्षांचा कालावधी बाकी असताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
वसुंधरा राजे यांच्या समर्थकांकडून मुख्यमंत्री पदासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. राज्यात वसुंधरा राजे यांच्याशिवास मुख्यमंत्री पदासाठी लायक कोणताही नेता नाही. त्याच एकमात्र सर्वश्रेष्ठ नेत्या आहेत, अशी वक्तव्य त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहेत. या वक्तव्यांमुळे पक्षात दुफळी माजली असून विशेष म्हणजे चक्क वसुंधरा राजे यांच्या काही समर्थकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
या नोटिसीला पंधरा दिवसांत उत्तर मागितले आहे. राज्यात पहिल्यांदाच वसुंधरा राजे यांच्या समर्थकांना अशाप्रकारची नोटीस पाठवल्याचे बोलले जात आहे. दिल्लीतूनच तसे आदेश आले असून या नेत्यांना लगाम लावण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान,या घडामोडींवर वसुंधरा राजे यांच्याकडून कोणतंही वक्तव्य आलेलं नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष असणार आहे.
राज्यात कॉंग्रेसमध्ये दुफळी माजली असताना भाजपला मोठा फायदा घेण्याची संधी आहे. मात्र भाजपमध्ये सुरु असणाऱ्या या अंतर्गत वादामुळे म्हणावा तेवढा फायदा भाजपला होताना दिसून येत नाहीये. उलट भाजपमधील या वादाचा काहीअंशी दिलासाच कॉंग्रेसला मिळणार आहे. कारण भाजपमध्येच दुफळी असेल तर राजस्थानमधील सरकार पाडण्याचा नाराज कॉंग्रेस आमदार विचार देखील करू शकणार नाहीत. त्यामुळे भाजपमधील वादाचा अप्रत्यक्ष फायदा कॉंग्रेसलाच होत असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता चित्रा वाघ यांच्या खांद्यावर चंद्रकांतदादांनी सोपवली ‘विशेष’ जबाबदारी !
- चित्रा वाघ यांच्यावर नवी जबाबदारी सोपविण्यामागे भाजपचा नेमका काय आहे उद्देश ?
- विधानसभा अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ?
- उद्धवजी… जबाबदारी एकमेकांवर ढकलून लसीकरण मोहीम यशस्वी होईल का ?
- समता फाऊंडेशनचे उल्लेखनीय कार्य! ३० हजार जणांचे मोफत लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
