पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या 23 गावांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी मागील वर्षी पासून हालचाली करण्यात येत होत्या. महापालिकेच्या हद्दीलगतची 34 गावे महापालिकेत समावेश घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यावर कार्यवाही करताना पहिल्या टप्प्यांत 11 गावांचा समावेश झाला. मात्र, उर्वरित गावेही टप्प्याटप्प्याने महापालिकेत घेण्यात येतील, असे शपथपत्र युती सरकारच्या काळात न्यायालयात सादर केले होते.
यानंतर महाविकास आघडीचे सरकार आले आणि पुन्हा पालकमंत्रीपदी विराजमान झालेल्या अजित पवार यांनी अधिक पुढाकार घेतला. पुणे महापालिकेच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांचा महापालिकेत समावेश करण्याची अधिसूचना आज जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी अजित पवार यांनी याबाबत बैठक घेऊन मंजुरी दिल्यानंतर आज लगेचच ही अधिसूचना काढण्यात आली आहे.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल या गावांमधील सर्व शासकीय आस्थापना पुणे महापालिकेकडे वर्ग करण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती दिली होती. राज्य शासनाच्या सर्व विभागांनी त्याला संमती दिली आहे. कालच्या बैठकीमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत या सर्व मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर, आज अधिसूचना जाहीर करून औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावं –
1. बावधन बुद्रुक
2. किरकिटवाडी
3. पिसोळी
4. कोंढवे – धावडे
5. कोपरे
6. नांदेड
7. खडकवासला
8. मांजरी बुद्रुक
9. नऱ्हे
10. होळकरवाडी
11. औताडे-हांडेवाडी
12. वडाची वाडी
13. शेवाळेवाडी
14. नांदोशी
15. सणसनगर
16. मांगडेवाडी
17. भिलारेवाडी
18. गुजर निंबाळकरवाडी
19. जांभुळवाडी
20. कोलेवाडी
21. वाघोली
22. म्हाळुंगे
23 सूस
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आघाडीत मोठे वाद आणि संशय; शिवसेनेनं भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे’
- ‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामे करता का?’, हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापले
- ‘फडणवीसांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर कारवाई करा’, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढवण्याचा प्रयत्न’, जयंत पाटील यांची माहिती
- ‘तू फक्त माझ्या पैशाचा व मनाचा वापर केलास’, प्रेयसीने दुसऱ्याशी साखरपुडा केल्याने प्रियकराची आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

