Share

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा होणार समावेश

Published On: 

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना शेतीविषयी ओढ निर्माण व्हावी आणि योग्य ते ज्ञान मिळावं यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार आहेत.

कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विषयावर शिक्षणमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.  सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग ०.९३ टक्के असून तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास या प्रस्तावामुळे कृषी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल.

त्याशिवाय ग्रामीण भागात कृषी संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल, असे सांगून शेतीला प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे या वेळी म्हणाले. तर पर्यावरणाचा समतोल राखणे व जैवतंत्रज्ञानावर आधारित शेतीला चालना देण्याची गरज या शिक्षणामुळे निर्माण होईल, असे मत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी मांडले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!