मुंबई : आज पार पडलेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार प्रामुख्याने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्षांपर्यंत वाढवण्याला मान्यता देण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
याआधीही वयोमर्यादा सुरुवातीला 58 होती मग ती 60 करण्यात आली आणि आता 62 वर जात आहे. सध्याची परिस्थिती राज्याला अधिकाऱ्यांची असलेली गरज लक्षात घेता हा निर्णय घेत आला आहे. या निर्णयामुळे अनेक अधिकारी वर्गाला तसेच राज्याच्या आरोग्य सेवेला फायदा होणार आहे. याआधी 60 वयोमर्यादा करण्याचा निर्णय 31 मे 2015 ला करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 5 वर्षांनी पुन्हा हा निर्णय घेण्यात येतो.
तसेच कोरोना संकट काळात वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभागात साडेपंधरा हजार जणांची भरती करणार असल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांना पदभरतीच्या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. यात गट अ ते गट क या विभागातील एकूण 15 हजार 511 पदे ही लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार असल्याचं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ! राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता
- ‘विष्णूपुरी, दुधना’चे दरवाजे उघडले, ९० हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू
- ..अन् आव्हाड म्हणाले, ‘माझी एकुलती एक मुलगी राजकारणापासून कोसो दूर आहे आणि राहील’
- मोदी सरकारची घोषणा! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ
- शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट; केशव उपाध्ये यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
