🕒 1 min read
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा संघ आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या शानदार सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांच्या नजरा त्यांच्या पहिल्या विश्वचषक विजेतेपदावर आहेत. T20 प्रकारात आतापर्यंत कोणत्याही संघाला ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आजच्या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला त्यांच्या सर्वात मजबूत प्लेइंग इलेव्हनसह यायचे आहे.
दरम्यान, न्यूझीलंडचा जखमी खलाडू डेव्हॉन कान्वेच्या जागी सेइफर्टला संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंड संघ पूर्णपणे प्रस्थापित दिसत आहे. कर्णधार केन विल्यमसनचा फॉर्म मात्र चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मार्टिन गुप्टिलला सलामीला चांगली कामगिरी करावी लागेल, तर डैरिल मिचेलने स्वतःला सलामीवीर म्हणून सिद्ध केलं आहे.
दुखापतग्रस्त डेव्हॉन कान्वेच्या जागी सेइफर्ट संघात खेळेल अशी अपेक्षा आहे. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी आणि ईश सोधी ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणू शकतात. अष्टपैलू जिमी नीशम फॉर्मात असल्याने किवींसाठी दिलासादायक बातमी आहे.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन
मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, सेफर्ट (विकेटकीपर), केन विल्यमसन (क), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी
महत्वाच्या बातम्या
- ‘कोण म्हणतं देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय!’
- राज कुंद्रा-शिल्पाच्या अडचणीत वाढ; व्यावसायिकाने केला फसवणुकीचा गुन्हा दाखल
- ‘काँग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच मित्रपक्षाने घेतली आहे’
- राज्य सरकार रझा अकादमीवर का कारवाई करत नाही?; किरीट सोमय्या
- तुम्ही देशाची रक्षा करण्यास असमर्थ; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
