नवी दिल्ली : पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना सोयीस्कर असे बदल केले जात आहेत. आता शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या मार्गी लागणार आहेत. गावपातळीवर कॅम्पचे आयोजन केले जाणार. या कृषी विभागाच्या धोरणामुळे तब्बल ६ लाख शेतकऱ्यांची गैरसोय झाली होती. आता ही गैरसोय दूर होणार आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यावर जमा होण्यास अगोदर बँक खाते गरजेचे होते पण यासोबत आता एक बदल करण्यात आला आहे. तो बदल सविस्तर पाहूया…
कृषी विभागाच्या सुचनेनुसार पीएम किसान योजना ही आधार क्रमांकाशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खाते संदर्भात काही अडचणी येणार नाहीत. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. कृषी विभागाने केलेल्या या बदलामुळे खाते संदर्भातील येणाऱ्या समस्या शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागणार नाही. ११ वा हप्ता जमा करण्यापूर्वी या नव्या धोरणाचा वापर करून हप्ता जमा केला जाणार असल्याचे सांगितले आहे.
शेतकऱ्यांना आधारचा पर्याय खुला
अगोदर पीएम किसान योजनेची रक्कम केवळ खाते क्रमांकावर अवलंबून होती. पण आता शेतकऱ्यांना खाते क्रमांकाला आधारचा आधार कृषी विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांसाठी आधारचा पर्याय खुला केला आहे. कृषी विभागाने बँक खात्याला आधारचा पर्याय खुला ठेवावा, अशी मागणी केंद्राकडे केली होती. याला मंजुरी मिळाली असल्याने तब्बल ६ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कित्येकदा शेतकऱ्यांना खाते क्रमांकाबाबद विविध कारणे सांगून हप्ते लांबविले जात होते. कृषी विभागाने हा आधारचा पर्याय सांगून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :


