Share

भारतीय संघाला मोठा धक्का ; कोहलीवर एका सामन्याची बंदी ?

Published On: 

मुंबई : भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला. पण त्यानंतरही भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो, कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीवर बंदी येऊ शकते, असे आता समोर येत आहे.

भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात होता. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने हा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा होता. त्यामुळे भारतीय संघ पूर्ण ताकदीने या सामन्यात उतरलेला पाहायला मिळत होता. मात्र या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एका कृतीने भारताचा कर्णधार विराट कोहली अडचणीत आल्याची चिन्हे आहेत.

दुसऱ्या कसोटीत भारताला विजय मिळाला असली तरी भारतीय कर्णधार विराट कोहली तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळेल की नाही यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराटने अंपायरशी सामन्यादरम्यान वाद घातला होता. त्याने अंपायर नितीन मेनन यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

अक्षर पटेलने तिसऱ्या दिवसाचा शेवटचा षटक टाकला. त्यात जो रुट पायचीत असल्याची अपील करण्यात आली. मैदानातील अंपायर नितीन मेनन यांनी या अपीलला नाबाद दिलं. त्यानंतर कोहलीने डीआरएस घेतला. त्यात रुट सरळ बाद दिसत होता. पण थर्ड अंपायरने रुटला नाबाद घोषित केलं आणि रुटला जीवदान मिळालं. त्यानंतर कोहलीचा पारा चढला आणि त्याने सरळ अंपायर नितीन मेनन यांच्याशी वाद घातला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रींनी देखील थर्ड अंपायर यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

आयसीसीच्या नियमानुसार कलम २.८ नुसार विराटवर कारवाई होऊ शकते. यानुसार कोहलीवर ४ डिमेरिट्स गुण लागू शकतात. ४ हुन अधिक डिमेरिट्स गुण लागल्यास एक सामना न खेळण्याची कारवाई होते. त्यामुळे विराटला देखील या शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!