🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान सिडनीत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड निर्माण केली आहे. भारतीय संघासाठी आजचा दिवस हा निराशाजनक ठरला असून दोन दिग्गज खेळाडूंच्या जखमी होण्यामुळे मोठा फटका बसला आहे. पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाला ३३८ धावांवर रोखले होते.
यानंतर, आजच्या म्हणजेच तिसऱ्या दिवशी भारतीय संघ २४४ धावांवर ऑल आऊट झाला. तिसऱ्या दिवस हा ऑस्ट्रेलिया संघाच्या पदरात पडल्याचे दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावास सुरुवात झाली. आजच्या दिवसाखेर १०३ वर २ बाद झाले असून आजच्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने १९७ धावांची आघाडी घेतली आहे.
अशातच, भारताला खेळाडूंच्या दुखापतीला देखील सामोरं जावं लागत आहे. फलंदाजी करत असताना अष्टपैलू रवींद्र जडेजाला मिशेल स्टार्कच्या चेंडूचा मार बसला आहे. मिशेल स्टार्कने रवींद्र जडेजाला शॉर्ट बॉल टाकला होता. हा बॉल जडेजाच्या थेट अंगठ्यावर जावून आदळला. यानंतर त्याला गोलंदाजी करताना देखील त्रास झाला.
यानंतर जडेजाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, तपासणीत त्याच्या अंगठ्याचं हाड मोडलं असल्याचं समोर आलं आहे. तर, विकेट कीपर ऋषभ पंतही दुखापतग्रस्त झाला असून त्याच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करणार असल्याची माहिती बातम्यांमधून समोर येत आहे.
त्यामुळे, भारतीय संघाला या दोन खेळाडूंच्या न खेळण्यानं मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. जडेजाला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरित दौऱ्यात म्हणजेच पुढच्या कसोटी सामन्यात देखील खेळू शकणार नाही. मधल्या फळीत त्याची महत्वपूर्ण भूमिका असते. यासोबतच पहिल्या डावात त्याने केलेल्या थ्रोमुळे स्टीव्ह स्मिथ धावबाद झाला होता. यानंतर जडेजाचं कौतुक देखील करण्यात आलं. मात्र, आता त्याला खेळता येणार नसल्याने भारतीय संघ उर्वरित सामन्यात कसं पुनरागमन करणार हे महत्वाचं ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईच्या विभाजनाचा काँग्रेसचा डाव; भाजप नेत्याचा हल्लाबोल
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – उद्धव ठाकरे
- ..हा तर एमआयएमला बदनाम करण्याचा डाव-खा.इम्तियाज जलील
- ‘भाजप कर्मकांडातच व्यस्त’, मित्रपक्षाकडून भाजपला टोला
- संभाजी महाराजांच्या नावाचा फलक फाडणाऱ्याला तात्काळ अटक करा – सचिन खरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
