Share

इंग्लंडला मोठा धक्का, दुखापतीमुळे ‘हा’ प्रमुख गोलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार

Published On: 

मुंबई : इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत झाला. अखेरच्या दिवशी भारताला १५७ धावांची गरज होती. मात्र अखेरच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने एकाही चेंडुचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे पावसामुळे विजयाने भारताला हुलकावणी दिली.

भारत आणि इंग्लंड संघादरम्यान दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स येथे १२ ऑगस्टपासुन सुरु होणार आहे. या सामन्यापुर्वी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सरावादरम्यान इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. यामुळे ब्रॉडला चालताही येत नव्हते. यामुळे भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे. मात्र त्याची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल अद्यापही खुलासा करण्या आलेला नाही. जर त्याची दुखापत गंभीर असली तर तो संपुर्ण मालिकेतून बाहेर पडु शकतो.

जखमी ब्रॉडच्या जागी इंग्लंडच्या संघात मार्क वुडला संधी देण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. तसेच भारताचा अष्टपैलु खेळाडू शार्दुल ठाकुरही जखमी झाल्याने दुसरा सामन्यातून बाहेर पडु शकतो. त्याच्या मांसपेशीमध्ये तणावामुळे त्याचे खेळणे अनिश्चीत मानले जात आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!