मुंबई: मालेगाव महानगरपालिकेतील (Malegaon Municipal Corporation) काँग्रेसच्या सर्व २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख (former MLA Rashid Sheikh)आणि महापौर ताहिरा शेख (Mayor Tahira Sheikh) यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. या सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे.
यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, “नाशिकचा विकास झाला, तसाच मालेगावच्या बाबतीत देखील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने एकत्र बसून चर्चा करू. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत येण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे, आणि हे तुम्हाला कामातून सिद्ध करून दाखवू, अशी ग्वाही मी सर्व सहकाऱ्यांना देतो. अनेक प्रश्न निर्माण होणार आहेतच. पण त्यातून मार्ग काढण्याचे काम आपण करू”
तसेच आपल्याकडून कुठली चूक होऊ देऊ नका. कायद्याचं, नियमाचं उल्लंघन होणार नाही, ही खबरदारीही आपण घ्या. नाहीतर राष्ट्रवादी पक्षात आपण गेलोय, गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे, पालकमंत्री आपले आहेत, भुजबळ साहेब घरचे आहेत, प्रांताध्यक्ष आपले आहेत, अजित पवार आपले आहेत असं म्हणाल. आम्ही जरूर तुमचे आहोत. पण तुमच्या कुठल्या कृतीतून राष्ट्रवादी पक्षाला, नेत्याला कमीपणा येईल. शरद पवारांची मान शरमेनं खाली जाईल, अशी कृती अगदी छोट्या कार्यकर्त्याकडून देखील घडता कामा नये, असा सल्लाही अजित पवारांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “एका महान व्यक्तीच्या नावाचा विरोध भाजप करत आहे”, ‘त्या’ घटनेवरून नवाब मलिकांनी भाजपला सुनावले
- वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”
- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण
- औरंगाबादेत येणारा पर्यटक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही-आयुक्त
- “डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

