Share

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मोठा धक्का; 17 पैकी 16 जागांवर शिवसेनेचा भगवा

Published On: 

नांदेड : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले अशोक चव्हाण यांना त्यांच्याच भोकर मतदारसंघात जबर धक्का बसला आहे. भोकर मतदारसंघातील बारडमध्ये 17 पैकी 16 जागांवर शिवसेनेने विजय मिळवून सर्वांनाच चकित केले आहे. शिवसेनेचा हा विजय अशोक चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे.

बारडमधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 17 जागांपैकी १६ ठिकाणी शिवसेनेने भगवा फडकावला आहे. या ठिकाणी सेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती. परंतु शिवसेनेने एकहाती विजय मिळवल्याचे सिद्ध झाले. दुसरीकडे, नायगाव मतदारसंघातून भाजप आमदार राजेश पवार यांचा त्यांच्या गावातून आलूवडगाव येथून पराभव झाल्याचे दिसून आले. आमदार पवार यांच्या 9 पैकी 3 उमेदवारांनाच विजय मिळवता आला आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल हाती आले आहेत. त्यापैकी सर्वात धक्कादायक निकाल नांदेडचा मानला जात आहे. येथील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा विजय म्हणजे मंत्री अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!