Share

“क्रांती एकदाच झाली त्यामुळे त्याचा पार्ट २ योग्य नाही, त्यापेक्षा “मी पुन्हा येईन” हा चित्रपट काढावा”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरेंना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट-२ काढता येईल, असा खोचक टोलाही भातखळकरांनी लगावला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भातखळकरांना प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत रुपाली पाटील ट्विट करत म्हणाल्या, ‘क्रांती एकदाच झाली तेही जुलमी इंग्रजी राजवट उलथून त्यामुळे त्याचा पार्ट २ योग्य नाही. त्यापेक्षा “मी पुन्हा येईन” हा चित्रपट काढावा पण यातील हिरो क्रांतिवीर पार्ट ज्यांची संकल्पना आहे त्यांनी ठरवावा…’, अशी खोचक टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर म्हणाले होते, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट २ काढता येईल. त्यांनी महाराष्ट्रात मद्यक्रांती घडवली आहे.’ तसेच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी येत्या काळात अफू आणि गांजाच्या शेतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असेही भातखळकर म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!