मुंबई : बॉलीवूडमधून ड्रग्स प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर आता बॉलीवूडकर मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत येत आहेत. याप्रकारणी काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये काम करणारे तीन प्रसिद्ध फॅशन डिझायनर्स मनीष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार यांची नावे चर्चेत आले होते. तर आता या प्रकरणी अभिनेत्री यामी गौतम, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, अभिनेत्री नोरा फतेही यांचे नावही चर्चेत आले आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेले कलाकार :
मनीष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार
या तीन प्रसिद्ध फॅशन डिझायनर्स यांनी पंजाबच्या नेत्याकडून लाखो रुपये बेकायदेशीरपणे घेतल्या प्रकरणी ईडी कडून यांना समन्स बजावण्यात आला होता. दिल्लीतील ईडी मुख्यालयात या तिन्ही फॅशन डिझायनर्सना वेगवेगळ्या तारखांवर चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. पंजाबच्या आमदाराने या तिघांना अवैधरीत्या लाखो रुपये रोख दिले होते. याप्रकरणी ईडीकडून तिघांची चौकशी करण्यात आली होती.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘काही वर्षांपूर्वी आमदाराकडे एक मोठे लग्न पार पडले होते, ज्यासाठी मनीष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितू कुमार यांच्याकडून डिझायनर कपडे खरेदी केले गेले. लाखो किंमतीचे हे कपडे रोख रुपये देऊन खरेदी केले गेले. यावरून आयकर चुकवण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या तिघांवर लागवण्यात आला होता.
यामी गौतम
मनी लाँड्रिंग प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम हिचे नाव देखील सामोर आले होते. यामीला सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. यामीला ७ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवलवण्यात आले होते. यामी विरोधात निघालेली ही दुसरी नोटीस होती.
मिळालेल्या माहितीनुसार यामीने परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्याचे अर्थात फेमाचे उल्लंघन केल्यामुळे तिची ही चौकशी केली गेली गेली होती. यामी गौतमने तिच्या खासगी बँक खात्यामधून परदेशी चलनाचे व्यवहाह केले होते. त्याची माहिती तिने संबंधित व्यवस्थेला दिली नाही. या आर्थिक व्यवहारांमुळे यामीची चौकशी करण्यात आली होती.
जॅकलीन फर्नांडिस
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने जॅकलिन फर्नांडिसची चौकशी सुरू केली आहे. जॅकलीन फर्नांडिसच्या बँक खात्यात एका परदेशी संस्थेकडून तब्बल १ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम आली होती. यात फेमा मार्गदर्शक तत्वांचं कोणतंही पालन करण्यात आलेलं नाही. यामी गौतमची चौकशी केल्यानंतर तिचीच सहकलाकार जॅकलीन फर्नांडिसला ईडीने चौकशीसाठी बोलावून घेतलं. एका परदेशी संस्थेतून तिच्या खात्यात व्यवहार कशासाठी आणि कसा झाला, याबाबत ईडी आता चौकशी करत आहे.
नोरा फतेही
जॅकलीन पाठोपाठ अभिनेत्री नोरा फतेहीलाही ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. दिल्लीच्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सुकेश चंद्र शेखरने २०० कोटींच्या फसवणूकित नोराचे नाव घेतले आहे. यामुळे नोराला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. याप्रकरणी नोरोला ईडीकडून समन्स पाठवण्यात आले होते.
दरम्यान आता असे म्हटले जात आहे की सुकेशच्या निशाण्यावर अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्माते तसेच कलाकारही आहेत. नोरा व्यतिरिक्त अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तसेच आणखी काही कलाकार आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सापडू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात. यामध्ये बड्या कलाकारांचे देखील नाव समोर येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- बुमराह-हर्षलला पछाडत शार्दूल ठाकूर बनला यूएईचा ‘किंग’
- देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये – रावसाहेब पाटील दानवे
- एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर गोंधळ घालतं – पडळकर
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

